"कोश वाङ्मय - ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन" कार्यशाळेत रचना प्रधानांचा  सहभाग उत्साही  शासकीयतेच्या पलीकडचा म्हणजे सकारात्मक आणि संबंधित सर्व प्रश्नांची जाणीव होणारा होता असे निश्चितच जाणवले. निबंध   वाचन  शैली प्रभावी होती. युनिकोड टंकात  जालावर उपलब्ध करण्याचा भाषासंचालनालयाचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थात कोणतेही  काम शासनाकडून करून घेण्याकरिता सर्व स्तरावर खेटेगिरी करावीच लागते, यात शॉर्टकट नसतो हे सत्य स्वीकारलेले बरे . मुंबईतील मराठी अभ्यास केंद्र  आणि सर्व स्तरावरील मराठी प्रेमी मंडळींनी हा प्रश्न मनावर घेतल्यास शक्य होईल असे वाटते.