अवांतर पण महत्त्वाचे : जालावर कोशांची आणि अन्य प्रकाशनांची साधी यादी उपलब्ध नाही, तर कोश कसे असतील? हे कोश पुस्तकांच्या दुकानांतही मिळत नाहीत.  क्वचित एखाद्या पुस्तक प्रदर्शनात दिसतात.(चू.भू.द्या.घ्या.)--अद्वैतुल्लाखान


:"कोश वाङ्मय - ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन" या ऐक्यभारती संशोधन संस्था आणि पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्तपणे आयोजित कार्यशाळेत , कोशकारांची संख्या बरी आणि पूर्ण महाराष्ट्रातून होती , पण बहुसंख्य मंडळी वयाने संगणक आणि जालाच्या परिघाबाहेरची  ज्येष्ठ होती .तरी सुद्धा आयोजकांनी संगणक तंत्रज्ञान आणि जाला संदर्भात सीडॅकचे  महेश कुलकर्णी सरांचे  मार्गदर्शन मिळेल हे पाहिले.

: आपण म्हणता तशी यादी श्री. धडफळे सरांशी कुणी संपर्क साधल्यास किंवा दुर्गा दीक्षित मॅडमनी मनावर घेतल्यास उपलब्ध होऊ शकेल असे वाटते.