गूगल ट्रान्स्लेट आणि बॅबेलफिश दोन्हींवरून बासियचा अर्थ बेसिन असा मिळत आहे. (तरी बऱ्यापैकी जवळ आहे.) कपाकरिता पोर्तुगीज़ शब्द कोपो असा मिळत आहे. ('कपा'पेक्षा 'कोप्प'च्या अधिक जवळ. म्हणजे मराठीवर पोर्तुगीज़ांचा इंग्रजांआधीपासूनचा प्रभाव ध्यानात घेता, 'कप' हे 'कोप्प'चे अपभ्रष्ट रूप मानावे, की स्वतंत्र इंग्रजी आयात मानावी? थोडक्यात, मराठीत 'कप' शुद्ध की 'कोप्प' शुद्ध? )