Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
जागतिक टेनिसमध्ये भारताचे नाव उंचावणारी सानिया मिर्झा काहींना एकाएकी भारताचे नाक कापणारी वाटू लागली आहे. कारण काय, तर पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कप्तान शोएब मलिकशी ती विवाहबद्ध व्हायला निघाली आहे. भारत - पाकिस्तान संबंध जणू काही स्वतःच्या मर्जीवर अवलंबून असल्याचा आव आणणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्र विधिमंडळातही हा विषय उपस्थित केला. सानिया हिचा जीवनसाथी निवडण्याचा हा निर्णय एकाएकी राष्ट्रीय महत्त्वाचा का वाटावा? शोएब मलिकशी विवाहबद्ध व्हायचे असेल तर पाकिस्तानात स्थायिक हो, तेथील नागरिकत्व स्वीकार आणि पाकिस्तानच्या वतीनेच टेनिस खेळ असे ...