संदिग्ध अर्थाचे उखाणे येथे हे वाचायला मिळाले:

शप्पत- करंगळी, मरंगळी, मधलं बोट, चाफेकळी, अंगठा. हाताच्या बोटांचा हा क्रम ग्राह्य धरला तर चाफेकळी आणि अंगठा यांच्या चिमटीत (स्वतःचा) कंठ पकडला की होते शप्पत. काही भाषाप्रभुंना हा शब्द शपथ असाही आवडतो पण शप्पतची परिणामकारकता शपथला नाही. शप्पत हे एखाद्या गोष्टीबद्दल समोरच्याला खात्री देण्याचं हुकुमी शस्त्र आहे. म्हणजे कसं की ’गोजमगुंडेबाई त्यांच्या घरात चेंडु गेला की विळीवर चिरुनच ठेवतात, तुझी शप्पत’ असं, यावर अपील नाही. प्रसंगी तो चेंडु विळीवर गळा कापून जीव देईल पण शप्पत खोटी जाऊ देणार नाही असलं भारी. शप्पत घेण्याच्या तीन पायऱ्या असतात; तुझी ...
पुढे वाचा. : बाष्कळ नोंदी