गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

पाच मिनीटे पाच मिनीटे करत चांगली वीस पंचवीस मिनीटांपर्यंत लांबवलेली आणखी थोडी झोप, कामाची, पुढच्या दिवसाची तयारी यात बरेचदा सकाळ कधी वाहून जाते कळतच नाही. माझ्या लक्षात राहीलेली ती सकाळ म्हणजे घरच्याच एका लग्नसराईतली आहे. गच्च थंडीतले दिवस.. चार दिवसांवर आलेल्या लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांनी घर भरुन गेलेले. सहा वाजता स्वयंपाकघरातून पहिल्यांदा दबक्या आणि नंतर खळखळून हसण्याच्या आवाजाने जाग आली. घरच्या स्त्रियांचा चहाचा पहीला राऊंड चालला होता. मस्त धुके पडले होते. अंगणातल्या सडा रांगोळीने मांडव खुलला होता पण असल्या थंडीत बाहेर उभी रहायची सोय ...
पुढे वाचा. : आठवण घटिका