>>.. त्या, शासकीय व्यक्तीकडून आपण कसलीच अपेक्षा करत नाही , रचना प्रधानांनानी स्वतःची रविवारची सुट्टी  खर्ची घातली याचा अर्थ त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर त्यांनी सजगता दाखवली.  <<
या रचना प्रधान कोण? त्यांनी आपला रविवार खर्ची घातला म्हणजे आपल्यावर केवढे उपकार केले!  भाषा संचालनालयाचे अजून संकेतस्थळ नाही, तर जालावर कोशांची यादी कुठून मिळणार? हे धडफळे म्हणजे मोहन धडफळे का? त्यांचा कोशवाङ्मयाशी काय संबंध? दुर्गा दीक्षितांनी कार्यशाळा आयोजित केली याचा अर्थ त्यांच्याकडे सरकारी कोशांची यादी आहे असे समजणे शुद्ध वेडेपणाचे आहे. त्यांना  सरकारने भाषाविषयक धोरणाचे एक पत्रक नुक्तेच प्रसृत केले होते हेही माहीत नव्हते, हे त्यांच्या विषयी पूर्ण आदर ठेवून लिहावे लागते आहे.  भाषा संचालनालय सध्या निव्वळ अनुवादांखेरीज काय काम करते ते जाणून घेण्यासाठी
दुवा क्र. १  उघडून पहा.