मातीचा दरवळ येथे हे वाचायला मिळाले:

जसजशी राई फळुफुलु लागली तशी आमच्या घराला, वाहनाला शेतकी कळा येउ लागली. गाडीची डिकी उघडली तर त्यात काय सापडेल याचा नेम राहिला नाही. कधी गमबुट, कुदळ फावडे, तर कधी ठिय्या देउन बसलेला टमटमीत चिकाळ फणस. गावाकडची मंडळी नुकतीच गाडीत बसुन गेली असली तर गाडीत अस्सल गावाचा शेणा-खताचा – तांबड्या मातीचा वास परमळतो.

डिसेंबरमध्ये खालच्या जमिनीत खाचरं तयार करुन घेतली आणि बोअर मारली. आणि अगदी खालच्या दोन वावरात बटाटा पेरला. पंप बंद पडणे, वीज बेभरवश्याची असणे हे नेहमीचे घटक होतेच. दुसरे एक ठरवले की शक्यतो जैविक शेती ...
पुढे वाचा. : खंडु बटाटे…