मराठी अभ्यासकेंद्राने भाषा संआलनालयाकडे वेगवेगळ्या मागण्यांसाठी तगादा लावण्याए ठरवले हे आंगले आहे.
बरहा किंवा तत्सम युनिकोडाधारित टंक वापरताना 'च'साठी   रोमन 'सी' हे अक्षर वापरावे लागते. मनोगतावर मात्र 'सी‌एच्'. नुसता 'सी' वापरला तर 'संआलनालयाकडे', 'लावण्याए', किंवा 'आंगले'सारखे मुद्रणदोष होतात.
दुसऱ्या परिच्छेदातल्या वाक्यात काही विरामचिन्हे पेरली असती तर ते वाक्य समजायला जरा सोपे पडले असते.  'का ज्याने त्याने आपल्या पानात वाढलेल्या भातातून खडे बाजूला काढावेत' या धर्तीवर 'ज्याने त्याने आपापली विरामचिन्हे टाकून घ्यावीत असा उद्देश आहे? 'पिए मधील डेस्क ऑफिसर' हा काय प्रकार आहे?
तिसऱ्या परिच्छेदातल्या 'चरेकरिता'चा अर्थ समजला नाही.
ई-सकाळमधली बातमी येथे छापली ते एक बरे झाले. याच बातमीचा दुवा मी 'मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश' या लेखाखाली दिला होता.--अद्वैतुल्लाखान