पुण्यासारख्या शहरामध्ये गावाबाहेर (पाषाण, बाणेर इत्यादी) राहणाऱ्या विद्यार्थ्यांना  मराठी माध्यमाच्या शाळा खूप दूर
पडतात, ही गोष्ट खरी आहे. लहान मुलांना केवळ मराठी माध्यमाची आहे म्हणून दूरच्या शाळेत घालणे धोक्याचे असते. 
अशा मुलांना आपल्या हट्टाने दूरच्या शाळेत घातलेच, तर त्याला तो राहतो त्या परिसरातले मित्र मिळत नाहीत, आणि
त्याचे जन्मभराचे नुकसान  होते.  प्राथमिक शाळेत मुलांची होणारी मैत्री  कायमची असते.
मराठी माध्यमाची शाळा जवळ नसेल तर आजूबाजूची मुले ज्या शाळेत जात असतील त्याच शाळेत मुलाला घालावे,
मग ती शाळा उर्दू माध्यमाची का असेना!  शिक्षणाचा दर्जा माध्यमावर अवलंबून नसतो.
मुलगा मोठा झाला की त्याला हव्या त्या माध्यमाच्या चांगल्या शाळेत घालावे. माझ्या माहितीची अनेक मुले हिंदी-सिंधी-गुजराथी
माध्यमांनंतर शेवटी इंग्रजी माध्यमात रुळली होती.--अद्वैतुल्लाखान