वरदाबाईंनी २८ ऑक्टोबर २००५ रोजी सुरू केलेल्या, इंग्रजी शब्दांच्या मराठी उच्चारांच्या चर्चेसंदर्भात, मी २ जानेवारी २००७ रोजी टंड्रा आणि टुंड्रा हे दोन्ही उच्चार बरोबर आहेत असे एक, इतरांच्या मताशी फारकत घेणारे विधान माझ्या प्रतिसादात केले होते. सर्वांनी (बहुधा मी काहीबाही लिहिले आहे असे समजून) त्या विधानाकडे दुर्लक्ष केले होते. आज सहज ती चर्चा सापडली, म्हणून TUNDRAचा खरा उच्चार काय ते पाहण्यासाठी शब्दकोश उघडले. ऑक्सफर्डने टुंड्रा हा एकमेव उच्चार दिला आहे तर, वेबस्टरने टुंड्रा आणि टंड्रा असे दोन्ही. मराठी शिक्षक ऑक्सफर्डला प्रमाण मानत असल्याने त्यांना टुंड्रा हाच उच्चार मुलांना शिकवला तर, नंतरच्या शिक्षकांनी टंड्रा. तेव्हा त्या चर्चेवरून कुणी काही मतबांधणी केली असेल तर त्यांनी योग्य तो बोध घ्यावा.
ती चर्चा अशीच चालू राहावी असे मत चर्चेदरम्यान व्यक्त झाले असल्याने, मध्येच बंद झालेल्या त्या चर्चेत मी थोडे इंधन टाकून यज्ञकुंड प्रज्वलित ठेवीत आहे.