"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:
खरं म्हणजे महिनाभरापूर्वी जेव्हा मी 'गाभ्रीचा पाऊस' पाहिला, तेव्हाच मी लिहिणार होतो, पण असो. आज टीव्हीवर 'समर २००७' हा पडलेला पण एक चांगला प्रामाणिक प्रयत्न असलेला सिनेमा पाहताना मला 'गाभ्रीचा पाऊस'ची प्रकर्षाने आठवण झाली. 'समर २००७' सुद्धा विदर्भातल्या शेतकर्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. शहरातल्या लोकांची ह्या समस्येकडे पाहण्याची मानसिकता दाखवतो. अतिशय अंगावर येणारे असे काही प्रसंग आहेत ह्या सिनेमात. पण आपल्या कचकड्याच्या दुःखांमध्ये रमणार्या प्रेक्षकांनी अपेक्षेप्रमाणेच ह्या सिनेमाकडे पाठ फिरवली. त्या ...