शब्द-पट म्हणजे कोडं.. येथे हे वाचायला मिळाले:

’प्रिय’,

माझी अर्ध्याहून अधिक पत्रं या मायन्यावरच अडलियेत.
म्हणजे तू ऑलरेडी ’प्रिय’ असताना तुला उद्देशून आणखी एकदा प्रिय म्हणावे तरी कसे? यावर मग नकोच लिहायला म्हणुन मी पुढे लिहायला लागते.
मराठीत या क्षणी तुला उद्देशून वापरावे असे एकही संबोधन नाही.
तुला एव्हढ्या भाषा येतात. एकातलं तरी सांग ना.

-----------

तर..
आज संध्याकाळी ’संध्याकाळच्या कविता’ काढल्या. मग तुझी अशी सरसरून आठवण झाली की काय म्हणतोस.
मग मला वाटलं की अशाच एखाद्या संध्याकाळी तू सुद्धा ग्रेसची कोडी सोडवत असताना तुला माझी आठवण येत असेल ...
पुढे वाचा. : ’प्रिय’,..