शासकीय  कार्यपद्धती त प्रस्ताव लिहिणारी एका विभागीय कार्यालयातील कारकून मंडळी ते मंत्रालय असे भले मोठे चक्र असते. ते माहीत नसेल तर केवळ वृत्तपत्रीय बातम्या होतात, प्रत्यक्ष कामे होणे जड जाते. संबंधितांच्या माहितीचे संकलन आणि कार्यपद्धतीचा फ्लो उपलब्ध असेल आणि प्रत्येक स्तरावरून काम झाले का हे सतत तपासल्यास काम होण्याची शक्यता बळावते.

अशी माहिती बऱ्याचदा काही व्यक्तींना असते पण ती नोंदवली न गेल्याने संबंधींत व्यक्ती  व्यक्तिगत अडचणीमुळे उपलब्ध न राहिल्यास पुढील कार्यास खीळ बसते .

 पुन्हा एकदा चार सहा वर्षांनी वृत्तपत्रात बातमी वाचण्यास मिळण्यापलीकडे कार्य पुढे जावे आणि माहिती सर्वांना असेल तर दबाव
सर्व बाजूंनी आणता येतो .

मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश  लेखाचा उद्देश मुख्यत्वे पारिभाषिक शब्द निर्मिती , कशी होते अथवा व्हावी असा अभिप्रेत आहे, भाषा संचालनालयातील सुधारणा हा वस्तुतः स्वतंत्र विषय असल्यामुळे या स्वतंत्र चर्चेची योजना केली.