...विहिरी (म्हणजेच वेली; इंग्रजीत वेल म्हणजे विहीर, त्याचे मराठीतील अनेकवचन वेली. द्विरुक्ती केवळ विहिरींना अधोरेखित करण्यासाठी केली असावी, असे वाटते.) असाव्यात. 'अजाणत्या' हे विशेषण स्त्रीलिंगी अनेकवचनी आहे. विहिरी आणि वेली (अर्थात विहिरी म्हणजेच वेली) याही स्त्रीलिंगी अनेकवचनी आहेत, तर क्षत्रपती किंवा कुरण हे स्त्रीलिंगी अनेकवचनी नाही. मला वाटते येथे अन्वय स्पष्ट आहे.
पण विहिरी (म्हणजेच वेली) या अजाणत्या काय म्हणून, या प्रश्नाचे उत्तर केवळ कवीच देऊ शकेल, असे वाटते. बहुधा रगडण्याकरिता सरसावून येणाऱ्या राव्याची कल्पना नसल्यामुळे त्या अजाणत्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.