Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या काही वर्षांत नक्षलवादाने पुन्हा एकवार गंभीर स्वरूप धारण केले आहे. पोलीस आणि निमलष्करी दलांशी गनिमी काव्याने लढत माओवाद्यांनी घातलेल्या थैमानाच्या पार्श्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतेच आपल्या लालगढ भेटीत त्यांना चर्चेसाठी सामोरे येण्याचे आवाहन केले. माओवादी हे भेकड असल्याचेही चिदंबरम म्हणाले. परंतु त्यांना भेकड म्हणत असताना स्वतः मात्र हेलिपॅडवर उतरल्यावर जवळच अवघ्या शंभर मीटरवर जाण्यासाठी त्यांना स्वतःला बुलेटप्रुफ कारचा आसरा घ्यावा लागला. पश्चिम बंगालच्या त्या दुर्गम भागामध्ये माओवाद्यांची किती दहशत निर्माण ...