राम आणि शाम बालपणीच अनाथ झालेले दोन तरुण.

रामः (शामला बघून) शाम तू लहानपणी जत्रेत हरवला होतास का?
शामः नाही.
रामः (उत्तेजित होऊन) मीही नाही.

रामः तुझ्या गळ्यात आईबाबांचा फोटो असलेले लॉकेट आहे का?
शामः नाही
रामः(डोळ्यात अश्रू दाटतात) माझ्याही नाही
शामः तुझ्या आईबापांना जालिमसिंगने गोळ्या घालून मारले का?
रामः नाही.
शामः (अधिकच उत्तेजित) माझ्याही नाही.
रामः तुझा वाढदिवस १२ जूनला आहे का?
शामः नाही
रामः माझाही नाही.
शाम (कंठ दाटलेला) रामभैय्या! तूही मेरा बिछडा हुआ भाई!
रामः शामभैय्या! (मिठी मारुन अश्रूपात करतात)