एक्स असणाऱ्या कनेक्शन मधल्या एक्स चा उच्चार क्श असा होतो तर  क्ष चा उच्चार क्‍ष असा आहे, असे वाटते.

मान्य, पण...

आमचे एक प्राध्यापक फंक्शन चा उच्चार फंक्षन असा करत असत त्याची आठवण झाली

नेमका मुद्दा! मराठीत सर्वसाधारणतः फंक्षन, जंक्षन, कनेक्षन आणि सर्वेक्षण यांचा उच्चार नैसर्गिकतः सारखाच होतो असे वाटत नाही काय? (चूभूद्याघ्या!) मग 'रिक्षा' हा शब्द ज्याप्रमाणे 'रिक्शा' असा लिहिला न जाता 'रिक्षा' असाच लिहिला (आणि उच्चारला! ) जातो, त्याच नियमाने 'फंक्षन', 'कनेक्षन' असेही लिहिण्यास काय हरकत असावी?

("'ष'नंतर येणाऱ्या 'न'चा 'ण' होतो" या नियमास अनुसरून, या शब्दांचे संपूर्ण मराठमोळीकरण करताना - तसे ते करायचेच झाल्यास - ते 'फंक्षण', 'जंक्षण', 'कनेक्षण' असेही करण्यास निदान मला तरी काही प्रत्यवाय दिसत नाही. )