क्श आणि क्ष मधील उच्चारांतल्या फरकाची ज्याला एकदा माहिती मिळालेली आहे त्याच्याकडून सहसा त्यांच्यात गल्लत झालेली ऐकलेली नाही.
माझ्या माहितीप्रमाणे खरे तर उच्चार रिक्शा असा करायला हवा आणि तसाच तो लिहायला हवा; पण (अति)परिचयाने(की आपुलकीने?) तो रिक्षा असा उच्चारू जाऊ लागला आहे, असे असावे. चू. भू . द्या. घ्या.
मी इलेक्शनला ग्रामीण भागात इलेक्षण असेही म्हटलेले ऐकलेले आहे. (आणि कम्युनिस्ट ऐवजी कम्युनिश्ट आणि कम्युनिष्ठ !)
पूर्वीच्या काळच्या महिलांच्या तोंडी ऑफिसर ऐवजी आफीश्वर असा उच्चार असे, असे वाचायला मिळते, तसेच काहीसे.