>>.. त्या, शासकीय व्यक्तीकडून आपण कसलीच अपेक्षा करत नाही , रचना प्रधानांनानी स्वतःची रविवारची सुट्टी  खर्ची घातली याचा अर्थ त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर त्यांनी सजगता दाखवली.  <<

या रचना प्रधान कोण?

त्या कार्यक्रमात जो   निबंध श्रवणाचा योग आला त्या पलीकडे, या रचना प्रधान कोण? ते आम्हाला कल्पना नाही.इतर पूर्वग्रहांमुळे एखाद्या व्यक्तींच्या सकारात्मक प्रयत्नाचे महत्त्व नाकारणे कितपत सयुक्तिक आहे.  त्यांनी जो काही निबंध लिहिला तो निव्वळ पाट्या टाकण्याचा उद्योग म्हणून आपण त्याची वासलात लावणार आहोत काय ?

रचना प्रधानांशी आपण संपर्क केला आणि त्यांनी सरकारी कोशांची यादी दिली नाही असे काही असे आहे का ? किंवा इतर त्यांच्या  शासकीय कार्य कक्षेत येणारी  सकारात्मक गोष्ट निदर्शनास आणूनही केली नाही असे काही आहे का ? (असे असेल तर टीकेत आम्हालाही सहभागी  धरा) माझे म्हणणे फक्त वड्याचे तेल वांग्यावर निघू नये एवढेच आहे पूर्ण संस्थेच्या त्रुटीस आपण व्यक्ती विरोधाने सामोरे जाणे कितपत सयुक्तिक आहे ? आमचीच इतर बहुसंख्य मराठी  भावंडे मराठीकडे पाठ फिरवत असताना   रचना प्रधान किंवा इतर कोणाचेही साहाय्य मिळवण्याचा प्रयत्न करावयाचा का, .......  

दुर्गा दीक्षितांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत शासकीय नसलेल्या इतर बऱ्याच कोशकारांनी स्वतःच्या आणि इतर बऱ्याच कोशांची नावे नमूद केली होती त्या संदर्भाने मी म्हटले होते (आमच्या शुद्ध वेडगळपणा बद्दल क्षमा असावी).त्यांच्याकडून उपस्थित कोशकारांचे नाव ,कोश, पत्ते आणि  दूरध्वनी इत्यादी माहिती मला आंतरजालावर टाकण्याच्या दृष्टीने हवी होती ती त्याच्याकडून मिळवण्या एवढे कौशल्य अथवा व्यक्तित्व माझ्यात नसावे.

धडफळे म्हणजे मोहन धडफळे का?

नेमके ठाऊक नाही पण बहुतेक तेच असावेत , संबंध कसा ? त्यांची उपस्थिती आणि  इतर उपस्थितांशी  जाणवलेली घनिष्ठता.

त्यांना  सरकारने भाषाविषयक धोरणाचे एक पत्रक नुकतेच प्रसृत केले होते हेही माहीत नव्हते, हे त्यांच्या विषयी पूर्ण आदर ठेवून लिहावे लागते आहे.

अस शक्य असू शकत,  नाही का?