स्वप्नी
दंगलेला
कोण
आहे?
अस्तित्व
त्याचे
चिरंतन
की
आभास
मात्र
क्षणिक
आहे?
आत्मशोधास्तव
निमित्त
केवळ
कूटप्रश्न
हा
झाला.
जागृतीच
स्वप्नवत
आहे
बोध
प्रत्ययासी
मग
आला!
हुळहुळत्या
पाठीवर
सावळ्याने
ललाटीचे
मोरपीस
फिरवता
संदेह
निमाले
भवभय
पळाले
अवघे
वासुदेवमय
झाले
अवघे
वासुदेवमय
झाले!!