चार शब्द येथे हे वाचायला मिळाले:
सर्वांनी मिळुन बाहेर जेवायला जाणे हा आमच्या घरातिल अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. "धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय" या वाक्प्रचाराचं ते आमच्याकडलं उत्तम उदाहरण आहे. बाहेर जेवायला जाण्याच्या आमच्या ह्या कार्यक्रमात अनेक नानाविध वादांचा आणि भांडणांचा समावेश असतो.
सर्वात पहिला वाद म्हणजे "कुठे जायचं?" हा! या विषयावर एकमत न होण्याचं कारण म्हणजे प्रत्येकाला दर वेळी वेगवेगळं काहीतरी खायचं असतं. कुणाला चायनीज, कुणाला थाळी, कुणाला सामिष, कुणाला सीझलर ... एक ना दोन! आमच्या कुटुंबातल्या सगळ्यांना हवा तो पदार्थ एकाच ठिकाणी मिळू शकेल असं हॉटेल या ...
पुढे वाचा. : सहभोजन