धन्यवाद टग्या. तुमच्या प्रतिसादातून बरेच काही कळले व शिकायला मिळाले. तुमची बहुतेक मते पटली, मात्र

(शिवाय 'इंग्लंड', 'स्कॉटलंड' यांऐवजी 'इंग्लंद', 'स्कॉटलंद' असेही लिहिण्याकडे कल असे, असे कळते, परंतु याचे कारण हे मराठीतील नैसर्गिक उच्चारपद्धतीशी जवळिकीपेक्षा अगोदर उल्लेखिलेली रूपे ही मराठी कानांना अश्लील भासतात असे असण्याबद्दल ऐकलेले आहे.)

ह्याविषयी जरा साशंक आहे. ज्या काळात लग्नाच्या निमंत्रणपत्रिकेंवर स्वच्छपणे "अमक्याचा शरीरसंबंध तमकीशी करण्याचे योजिले आहे" असे छापले जायचे व ह्यात कोणाला काही गैर वाटायचे नाही त्या काळी केवळ उच्चारसाधर्म्यामुळे मुद्दाम असे बदल केले गेले असतील ? तसेच, 'इंग्लंड' व 'स्कॉटलंड'चे रूपांतर जरी 'इंग्लंद' व 'स्कॉटलंद' झाले तरी 'लंडन' मराठीत 'लंडन'च राहिले. त्याचे (हिंदी भाषकांच्या मुखी रुळलेले) 'लंदन' झाले नाही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि कलंडणे ह्या शब्दाचेही कलंदणे असे रूपांतर झाले नाही.