शिवाय 'इंग्लंड', 'स्कॉटलंड' यांऐवजी 'इंग्लंद', 'स्कॉटलंद' असेही लिहिण्याकडे कल असे, असे कळते, परंतु याचे कारण हे मराठीतील नैसर्गिक उच्चारपद्धतीशी जवळिकीपेक्षा अगोदर उल्लेखिलेली रूपे ही मराठी कानांना अश्लील भासतात असे असण्याबद्दल ऐकलेले आहे.
याउलट एक उदाहरण म्हणजे आज जरी सर्रास " मुलुंड" हे नाव रूढ झाले असले तरी १९८२ मध्ये मी जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आलो त्यावेळी रेल्वे स्थानकावर "मुळुंद" अशी पाटी वाचली होती. पुढे केव्हातरी नव्या पाट्या रंगवल्या आणि "मुळुंद" कायमचे लुप्त झाले. "मुळुंद" हे मुलुंडचे मूळ नाव असावे का?
विनायक