आपला राग व गोंधळ सहाजीकच आहे पण आपल्या सारख्या तरुणांनाच यातून मार्ग काढावयाचा आहे. शेवटी हेच आपले घर आहे आणि दुसरया देशात कितीही नाव कमावले तरी निर्वासित ते निर्वासितच...
हे देखिल विस्ररून चालणार नाही की ज्या देशांना आपण प्रगत म्हणून नावाजतो त्यांची सुरवात पण अश्याच समस्यांमधून झाली होतीं आणि त्या देशांच्या तरुणांनीच ईतिहास घडवला आणि जुन्या महात्म्यां बददल बोलाल तर त्यांना तरी कोठे समाजाने १००% साथ दीली होती तरी पण ते लढले, सावरकरांनी परदेशात शिक्षण घेतले पण देशासाठी त्याचा वापर केला. फरक येवढाच ते स्वातंत्र्यासाठी परकीयांशी लढले आज आपणास वेळ पडली तर स्वकियांशीपण लढावे लागणार आहे.
निदान आपण तरी पुढिल पिढीपुढे चांगले आदर्श ठेउया.."आपल्या भारत देशासाठीच काहीतरी करून दाखऊया .... "