("'ष'नंतर येणार्‍या 'न'चा 'ण' होतो" या नियमास अनुसरून, या शब्दांचे संपूर्ण मराठमोळीकरण करताना - तसे ते करायचेच झाल्यास - ते 'फंक्षण', 'जंक्षण', 'कनेक्षण' असेही करण्यास निदान मला तरी काही प्रत्यवाय दिसत नाही. )
अगदी कबूल. फंक्शनला एकवेळ मराठीत सोपा प्रतिशब्द आहे, पण रेल्वेच्या संदर्भातल्या जंक्शन-कनेक्शनला प्रतिशब्द नाहीत. त्यामुळे  क्शन चे  जरूर क्षण करावे.   मात्र, फंक्षण हा उच्चार मूळ फ़ंक्शनपासून खूप दूर जातो. आणि तो रोजच्या वापरातला नाही.  पण ज्यांच्या असेल त्यांनी 'फ़ं'क्षण म्हणायला हरकत नाही, पण अगदी 'फं'क्षण म्हणू नये असे वाटते. रिक्शाचे आता रिक्षा झालेच आहे, त्यात मुद्दाम बदल करायचे कारण नाही. दोनही शब्द प्रमाण समजावेत.
बटन, मटन यां शब्दांत ऋ, र, ष नसतानादेखील मराठी होताना त्यांच्यातल्या न चा ण होतो, नवनीतचे लोणी आणि पानीयचे पाणी होऊ शकते, तेव्हा रिक्शाचे रिक्षा आणि पोस्टचे पोष्ट  व्हायला काहीच हरकत नाही. --अद्वैतुल्लाखान