तुमचा स्पष्ट प्रतिसाद आवडला.
रविकुहराबाबत तुम्ही "अर्थात, एकही अक्षर कळू नये हाच जर हेतू असेल तर डाग काय आणि गुहा काय, फरक काय पडतो म्हणा" हे जे म्हणालात, तेच खरे आहे.
"मरुभूमीकणघृत रगडाया" ह्याचा संदर्भ प्रयत्ने वाळूचे कण रगडण्याशी आहे. (अर्थात इथे जर 'तेल' रगडले जाते असा अर्थ प्रतीत होत असेल तर ती शब्दरचनेतली चूक समजावी, क्षमस्व).
तुम्ही लावलेला काही अर्थ पण बरोबर आहे. पोपट हिरव्या रंगाचे प्रतिक आहे. मरुभूमीमध्ये हिरवा रंग प्रयत्ने नवचैतन्य घेऊन येतो. कोरडेपणाने एकमेकांपासून अलग झालेल्या सृष्टिघटकांना एकत्र आणण्याचे काम तो करतो.
पहिले कडवे हे क्षेपणास्त्रांबाबत अजिबात नसून पावसाची चाहूल लागल्यावर पडणाऱ्या विजेबद्दल आहे.