वर प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. काहीशी ओबड-धोबड कविता असल्यामुळे त्याचे निरनिराळे अर्थ निघणे साहजिक आहे. प्रतिसादांमध्ये विचारलेले प्रश्न वाचून त्या कवितेचा अर्थ लिहून देण्याची गरज भासली. तो खाली देत आहे.
ह्यातील काही शब्द/रचना ओढून-ताणून वापरली गेली आहे हे मी सर्व प्रथम मान्य करतो.
ही कविता अध्यात्मिक/राजनैतिक वगैरे अजिबात नाही. कवितेचा सरळ सरळ अर्थ लक्षात घेतल्यास हे लगेच दिसून येईल की ही एक निसर्ग-कविता आहे. पावसाची चाहूल लागते आणि वातावरणात कसे बदल होतात हे कवितेमधे आलं आहे.
पहिलं कडवं हे आकाशातून पडणाऱ्या विजेबद्दल आहे. "हीन स्वर" म्हणण्याचं कारण त्याची कंपनसंख्या साधारण मानवांच्या संवादाच्या कंपनसंख्येपेक्षा वेगळी आहे.
दुसरं कडवं - सूर्यावरच्या गुहामधली सावली (ही केवळ एक कल्पना आहे) ही ज्याप्रमाणे सूर्यावरच्या तप्तपणाशी अजाण असते, त्याप्रमाणे ह्या वेली वातावरणाच्या बदलांपासून (पावसाची चाहूल लागली आहे ह्या वस्तुस्थितीबाबत) अजाणत्या आहेत, पण त्या बदलांना प्रतिक्रिया म्हणून त्या अजाणतेपणी पृथ्विपतीच्या कुरणांवर विहरू लागतात.
तिसरं कडवं - ह्या तप्त भूमीला, त्याच्या वेगवेगळ्या झालेल्या घटकांना प्रयत्ने एकत्र करण्यासाठी (ज्याप्रमाणे कितीही प्रयत्न करूनही जरासंधाचे धड वेगळे करता येत नसे, इतकी एकरूपता आणण्यासाठी) हिरवा रंग सरसावून येतो.
शेवटच्या कडव्याचा अर्थ सरळ आहे. तो बऱ्याच जणांना कळला असेल. प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर वाचा.