रमा माधव यांच्याशी सहमत.
एरवी आम्ही असे करणार नाही, असे सांगणारा वर पक्ष लग्नात अचानक 'वर' जातो. उत्तर गोलार्धाच्या सर्वात वरच्या बाजूला आपण बसलो आहोत आणि वधूपक्षासह सर्व लोक कःपदार्थ आहेत, हे वर पक्षाला त्याच दिवशी अचानक वाटू लागते. अशावेळी कोणीतरी वातावरणात तणाव कमी केला पाहिजे. खेळकर स्वभावाचे लोक दोन्ही बाजूला असतात.
प्रेमविवाह असेल तर वधू दुसऱ्या दिवशी नवऱ्याला नक्कीच जाब विचारु शकते. ठरवून असेल तर जाब विचारायला गेला बाजार पंचवीस एक वर्षे तरी जातील. :)