मला काही सुचेना. मी पुढील दरवाजा किलकिला करून बाहेर पाहिले. माझी अवस्था घाबरलेल्या मांजरीसारखी झाली होती. बाहेर नेहेमीप्रमाणे मुलं खेळत होती. नेहेमीसारखी भांडणं चालू होती. समोरच वसणारा स्टोव्ह रिपेअर करणारा नेहेमी प्रमाणे पानवाल्याबरोवर जुगार खेळत होता. दिवेकर काकू बोंबाबोंब करित होत्या. म्हणजे सर्व काही नॉर्मल होतं.

अफलातून भाषा!

गोष्ट चांगलीच रंगते आहे. पुढे चालू दे.