मातृभाषेतून घेतलेले शिक्षण केव्हाही चांगलेच. कारण आपण विचार मातृभाषेतूनच करतो. पण आज काल इंग्रजीला आलेले महत्त्व बघता त्याला पर्याय नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमात मुलांना शिकवणे जास्त सोयिस्कर आहे. याचे एक कारण असेही असेल की जसे मद्रासी माणूस हिंदी पण त्याच टोनिंग मध्ये बोलतो. आपण लगेच ओळखून घेतो. तसेच आपण मराठी माणसे जेव्हा हिंदी बोलतो तेव्हा लगेच लक्षात येते. मला वाटते की मराठी शाळेत शिकलेली इंग्रजी भाषा आणि इंग्रजी शाळेत शिकलेली इंग्रजी भाषा याच्या उच्चारात फरक असतो. आजकाल बहुतेक मुले शिक्षण संपवून परदेशात जातात. कदाचित त्यांना तिथे अडचण येत असावी. हा माझा अंदाज आहे. खात्री नाही. जास्त करून इंग्रजी माध्यमापेक्षा कॉन्व्हेंट मध्ये जास्त चांगले उच्चार केले जातात. शिवाय सेंट्रल स्कूल मधेही. प्रतिष्ठा वगैरे काही नाही. शिवाय मराठीतून शिकलेली मुले मागे पडतात असेही नाही. शास्त्रज्ञ असलेले जयंत नारळीकर मागे एकदा म्हणाले होते की मी मराठीतून शिकलो आणि माझी मुलेही मराठीतच शिकली.