या गांगल महाशयानी केवळ आपला 'शोध मराठीचा' व 'गांगल१" या देवनागरी Font लोकांच्या गळी उतरविण्यासाठी आता फेसबूक या शोशल नेटवर्क (सामाजिक भेटीचे संकेतस्थळ ?? ) ला वेठीला धरलेले आहे. ते केवळ याचसाठी फेसबूकचे सभासद झाले असावेत. फेसबूकवरील मराठी सदस्यांना शोधून काढून त्यांना ते मित्रत्वाची विनंती (Friend request) पाठवतात. आणि फेसबूकवर ते जे 'status' लिहितात ते केवळ 'शोध मराठीचा ' साईट बद्दल व आता गांगल१ या Font बद्दलअ असते. मराठीबद्दल इतकं काही अजब लिहिलेल पाहिल्यानंतर सुरवातीला शंका उत्पन्न होऊन त्याबाबत प्रतिक्रिया लिहिली तर त्यावर ते काहीच उत्तर देत नाहीत. पण त्यांचे अजब शोध पाहून मराठीची चिंता मात्र वाटू लागली आहे. परवा रविवारी त्यांच्या गांगल१ या त्यांच्या Font बद्दल बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया आल्यावर शंकानिरसन करण्याऐवजी दर अर्ध्या तासाला 'शोध मराठीचा' या संकेतस्थळाबद्दल व गांगल१ या Font बद्दल ते status लिहीत सुटले.
आताशा त्यांचे status लिखाण वाचून करमणूकच होते.
आणि महत्त्वाचे म्हणजे ते ज्या गांगल१ Font ची एकमेवद्वितीय अशी जाहिरात करतात तो इंटरनेटच्या ब्राऊजरमध्ये त्यांना वापरता येत नाहीये कारण फेसबूकवरील त्यांचे मराठी लिखाण हे ' मंगल ' या font मध्ये असते. म्हणजेच ते बराहासारख्याचा वापर करून युनिकोडमध्येच लिहीत असावेत.
दुवा क्र. १