- प्रत्येक यंत्राला १-७ क्रमांक द्या.
- प्रत्येक यंत्रातून त्या त्या क्रमांका येवढे चेंडू घ्या. (३ क्रमांकाच्या यंत्रातून ३ चेंडू)
- आपल्याकडे एकूण २८ चेंडू असतील आणि त्यांचे खरे वजन २८० ग्रॅम असणे अपेक्षीत आहे. पण हलक्या चेंडूंमुळे ते कमी भरेल.
- आता १ ग्रॅम पर्यंत अचूक वजन करू शकणाऱ्या कोणत्याही काट्याने या चेंडूसाठ्याचे वजन करा.
- वजन जेवढे कमी भरेल त्या क्रमांकाच्या यंत्रातून सदोष चेंडू बाहेर पडताहेत. (समजा वजन २७५ ग्रॅम भरले तर ५ क्रमांकाच्या यंत्रात दोष आहे.)