नमस्कार मंडळी,
वरील विषयावर  मे २००७ पासून मराठीतून माझा ब्लॉग आहे..!!
दुवा : दुवा क्र. १
त्यातील एका लेखाचा  एक परिच्छेद व दुवा इथे देत आहे. 
दुवा दुवा क्र. २=2

Thursday 27 December 2007
कार्बोदके: प्रकारकार्बोदके २ : प्रकार
कार्बोदके मुख्यत: दोन प्रकारची आहेत.

१) साधी कार्बोदके अथवा शर्करा:

या शर्करेमध्येही दोन गट आहेत.
अ) गट पहिला: एक अणू शर्करा:
या गटामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज व गॅलॅक्टोज इत्यादी प्रकारच्या शर्करा येतात.
ग्लुकोज: ही तुमच्या रक्तातील महत्वाची साखर असून ती तुम्हाला त्वरीत उर्जा देते.
फ्रुक्टोज : ही साखर अतिशय गोड असून तॉ फळे व भाज्यांमध्ये असते.
मधामध्ये या दोन्ही शर्करा असतात.
ब) गट दुसरा: द्वीअणू शर्करा:
या गटात सुक्रोज, माल्टोज व लॅक्टोज इत्यादी शर्करा येतात.
सुक्रोज: ही ग्लुकोज व फ्रुक्टोज या दोन अणूंच्या संयोगाने बनते. सुक्रोज ही साखर अतिशय गोड असून ती ऊस व बीट यांपासून बनवितात. हीच सुक्रोज साखर घालूम तुम्ही रोज चहा/ कॉफी/ दूध पिता.