उन्हाळ्याची सुट्टी येथे हे वाचायला मिळाले:
बाबा कधीही एकदाच घराच्या बाहेर पडत नाही. निदान तीन वेळा तरी परत आत येतो. आधी पाकीट विसरतो, मग घराची किल्ली, मग गाडीची किल्ली आणि शेवटी उगीच "काहीतरी विसरलंय" असं वाटलं म्हणून. एवढ्या खेपा घालून तो एकदाचा रवाना झाला की दहा मिनिटात घरात त्याचा फोन खणखणू लागतो. मी शाळेत असताना मला न्यायला रिक्षावाले काका यायचे. शनिवारी बाबाला सुट्टी असायची आणि माझी अर्धा दिवस शाळा असायची. मग बाबा मोठ्या प्रेमानी माझ्याबरोबर माझं दप्तर घेऊन रिक्षावाल्या काकांसाठी थांबायचा. रिक्षा आली की मी मागे बसायचे आणि बाबा माझं दप्तर घेऊन काकांना द्यायला जायचा. खूप ...