आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल, कविता बारकाईने वाचल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे.
थोडे स्पष्टीकरण: या अगदी छोट्याश्या, वैयक्तिक अनुभवानंतर याबद्दल लिहावंसं वाटलं म्हणून पाचेक मिनिटात जसं सुचलं तसं लिहीत गेलो. हे अगदी उत्स्फूर्त, असंस्कारित लिखाण आहे. त्यामुळे थोडे तुटक, विस्कळित वाटण्याची शक्यता आहे. पण त्याच्या form वर फार विचार करत बसलो असतो तर त्याची तीव्रता कदाचित कमी झाली असती असं वाटतं. हे कविता, मुक्तक वा इतर कोणत्याही विभागात टाकायला माझी काही हरकत नाही.
लिखाण इतकं कच्चं असूनही इतक्या काळजीपूर्वक वाचून प्रतिसाद दिल्याबद्दल पुन्हा सर्वांचे आभार. अशाने माझा हुरुप नक्कीच वाढलाय.