पाहिल्या यंत्रातून १, दुसऱ्यातून २, तिसऱ्यातून ३, चौथ्यातून ४, पाचव्यातून ५, सहाव्यातून ६ आणि सातव्यातून ७ असे एकूण २८ चेंडू गोळा केले. आता सर्व यंत्रे जर सारख्या वजनाचे चेंडू बनवत असती तर या २८ चेंडूंचे वजन २८० असायला हवे. पण एक यंत्र कमी वजनाचा चेंडू बनवत असल्यास ह्या २८ चेंडूंचे वजन १ ते ७ ग्रॅमने कमी असेल.
समजा १ ग्रॅमने कमी आहे म्हणजे २७९ आहे तर पाहिले यंत्र कमी वजनाचा चेंडू बनवते. २ ग्रॅमने कमी असल्यास म्हणजे २७८ असल्यास २ यंत्र कमी वजनाचा चेंडू बनवते.... अश्या प्रमाणे सातवे यंत्र कमी वजनाच चेंडू बनवत असल्यास वजन २७३ असेल.
ह्यात वजन एकदाच करायचे ते कीती आहे यावरून कोणते यंत्र कमी वजनाचा चेंडू बनवते हे कळेल.