सरकारी प्रयत्नांपेक्षाही, हिंदी सिनेमातल्या गाण्यांमुळे हिंदी भाषा देशभर पसरली / लोकप्रिय झाली असावी.. परंतू ही भाषा खऱ्या अर्थाने हिंदी नसून हिंदुस्थानी आहे. खडी बोली, हिंदी, उर्दू आणि इतर भारतीय भाषांची सरमिसळ होऊन ही बोली तयार झाली असावी.. " मुझे तुमसे मुहब्बत है " या वाक्यातला " मुहब्बत" हा शब्द उर्दूतनं आलेला आहे... अशी कितीतरी उदाहरणे देता येतील..
शुद्ध हिंदीला राष्ट्रभाषा बनविणाऱ्यांच्या प्रयत्नास ( की दुराग्रहास? ) खरेतर भारतीय लोकमानसाने दिलेला हा शह आहे..