पोपट आणि गाढव चांगले मित्र असतात, एकदा ते खेलो इंडि खेलो चं तिकिट काढतात, त्यांना विदेश प्रवासाचे बक्षिस मिळते २ लोकांसाठी..दोघे विमान प्रवास प्रथमच करत असतात.. गाढवाला मिळते खिडकीजवळची जागा पोपटाला त्याशेजारी.. विमानातल्या ह. सुं. फारच सुंदर असतात.. विमान सुरु होते, पोपटाला ह. सुं. ची छेड काढण्याची हुक्की येते..

तो शिट्टी मारतो ती येते..                                               ह. सुं. - सर तुम्हाला काही पाहीजे का? काही अडचण आहे का? पोपट - "काही नाही माज..!"..

ह. सुं. वैतागून निघून जाते

अजून पाच मि. जातात

तो शिट्टी मारतो ती येते..                                               ह. सुं. - सर तुम्हाला काही पाहीजे का? काही अडचण आहे का? पोपट - "काही नाही माज..!"..

आता ती चिडते.. आणि कप्तानाकडे जाते.. "कप्तान कप्तान, तो माकडछाप पोपट फार माज करतोय काय करायचं?"

कप्तान - "जाऊ द्या हो बाई तो आपला कस्टंबर आहे.. जरा त्यांचे नखरे सहन करायला पाहीजे आपण.. एक दोन वेळा अजून बघा कदाचित शांत होईल तो.. बारक्या..!"

अजून पाच मि. जातात

तो शिट्टी मारतो ती येते..                                               ह. सुं. - सर तुम्हाला काही पाहीजे का? काही अडचण आहे का? पोपट - "काही नाही माज..!"..

आता ती तूफान चिडते.. आणि कप्तानाकडे जाते.. "कप्तान कप्तान, तो बिनडोक पोपट फार माजलाय काय करायचं?"

कप्तान - "अहो बाई .. फक्त शेवटच्या वेळेस वाट बघा.. आणि बारक्याने परत माज केला तर, विमानातले चात मुस्टंडे न्या, दरवाजा उघडा आणि द्या त्याला विमानाच्या खाली फेकून, आहे काय नाही काय..!"

...

हा सगळा प्रकार गाढव शांतपणे बघत असतो.. मनात विचार करतो.. हा पोपट महा-चालू आपल्याला खिडकीजवळ बसायला सांगून स्वतः ह. सुं. ची मस्त छेड काढतोय आपणही जरा मजा करावी..

गाढव - पोपट्भाय मेरेकोभी जरा ह. सुं. से बात करना है.. सीट बदलते क्या?

पोपट - क्यू नही क्यू नही..

आता गाढव शिट्टी मारतो ती येते                                       ह. सुं. - सर तुम्हाला काही पाहीजे का? काही अडचण आहे का?                                    

गाढव- "काही नाही माज..!"..

आता तिच्या तळपायची आग मस्तकाला जाते, चिडते आणि कप्तानाकडे जाते.. "कप्तान कप्तान, तो गाढव पण पोपटाच्या जोडीने फार माज करतोय काय करायचं?"

कप्तान - "जाऊ द्या हो बाई तो पण आपला कस्टंबर आहे.. जरा त्यांचे नखरे सहन करायला पाहीजे आपण.. एकदा दोन वेळा अजून बघा कदाचित शांत होईल हा पण बारक्या..!"

अजून पाच मि. जातात

तो शिट्टी मारतो ती येते..                                               ह. सुं. - सर तुम्हाला काही पाहीजे का? काही अडचण आहे का? 

गाढव - "काही नाही माज..!"..

आता ती तूफान चिडते.. आणि कप्तानाकडे जाते.. "कप्तान कप्तान, तो हलकट गाढव फार माजलाय काय करायचं त्याचं?"

कप्तान - "अहो बाई .. फक्त शेवटच्या वेळेस वाट बघा.. आणि बारक्याने परत माज केला तर, विमानातले चात मुस्टंडे न्या, दरवाजा उघडा आणि त्या पोपटाला आणि गाढवाला विमानाच्या खाली फेकून, च्या मारी उच्छाद मांडलाय नुसता..!"

अजून पाच मि. जातात

तो शिट्टी मारतो ती येते..                                               ह. सुं. - सर तुम्हाला काही पाहीजे का? काही अडचण आहे का? 

गाढव - "काही नाही माज..!"..

आता ती ह. सुं. नाचतच केबीन मध्ये जाते.. १-२-३-४ मुस्टंडे बरोबर घेवून येते. मुस्टंडे पोपटाला-गाढवाला बकोटीला धरुन उचलतात आणी दरवाजा उघडून विमानाबाहेर फेकून देतात..

-------------------------------------------------

आता विमानाबाहेर,

गाढव मरत-कडमडत कोलांट्या उड्या खात जमिनीकडे वेगाने कोसळत असतं.. पोपट छान ऐटीत उडत असतो.. तो गाढवाजवळ येतो आणि त्याच्या कानात कुजबुजतो..

 

पोपट - "क्या रे अल्लाउद्दीन तेरेको उडनेको आता क्या?"

गाढव - "नही मेरे भाय..!"

पोपट -"तो फिर वो उडन-खटोलेमें कायको इतना माज कर रहा था..!"

-----------------------------------------------------

हाहाहाहाहाअहाअह्हाह