(मी) इतका आळशी (आहे) की कधी महत्वाकांक्षा स्पर्शच करत नाही.
जग आपली काळजी वाहायला समर्थ आहे, मी ती घेत नाही.
दहा दिवस पुरतील इतके तांदूळ पोत्यात आहेत,
चुलीजवळ ढीगभर गवर्या पडलेल्या आहेत,
माया आणि ब्रह्माच्या गप्पा का मारायच्या?
भर रात्री छपरावर कोसळणाऱ्या पावसाचा नाद ऐकत
मी मस्त तंगड्या ताणून आरामात पहुडलो आहे.
मूळ काव्य: तायागू र्योकान (१७५८ - १८३१)
मुक्त अनुवाद: हरिभक्त (१९७० -???? )