चौथा स्तंभ येथे हे वाचायला मिळाले:
आटपाट नगरातली ही एक गोष्ट. तिथे असतं एक वर्तमानपत्र. ज्या काळात ते सुरु झालं तेव्हा ना ना म्हणता म्हणता पत्रकारितेच्या विश्वात नवी सकाळ उगवली. लोकांचं मत काहीही असलं आणि लोकांनी कुणाच्या हाती सत्ता दिलेली असली तरी बहुतेक पुढारी ते वर्तमानपत्र वाचल्याशिवाय सकाळची कुठलीही आन्हिकं करत नव्हते, अशी त्या वर्तमानपत्राची ख्याती होती. समृद्ध परंपरा असलेलं हे वर्तमानपत्र सध्या मात्र उत्तम व्यवस्थापन नसल्यानं गुळमुळीत झालंय, अशी चर्चा आहे. त्याला कारणंही तशीच आहेत म्हणे.... आता हे सगळं सांगण्याचं औचित्य काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्याचं असं ...