खुप छान लिहिलत. अतिशय विचार करायला लावणारं अन मूळ पुस्तक आता वाचायलाच पाहिजे असं वाटायला लावणारं.
>>>हाती शस्त्र घेतलेल्या या 'मी'ला मी दोष देऊ शकत नाही. आता अर्धं अंतर
चालत जाणं ही इथल्या राज्यसंस्थेची जबाबदारी आहे, हे माझं मत असतं. पण
त्याचवेळी हा 'मी' चुकतोय. हाती शस्त्र घेतल्यानं त्याचे प्रश्न थोडेच
सुटणार आहेत, असंही मन बजावत असतंच. याला कन्फ्यूजन म्हणा, चालेल. पण हे
असं आहे!......<<< खरच आज आपल्या सगळ्यांची काहीशी अशीच अवस्था आहे .
अन >>>'हिंदुस्थान टाईम्स'ला सांगितलेलं वाक्य वाचकासमोर येतं, "मी
नक्षलवाद्यांचा सामना करू शकतो, नक्षलवादाचा नाही. नक्षलवादाशी सामना
विकासाच्या माध्यमातूनच करावा लागेल."<<< अगदी, अगदी . हेही डोळ्यात अंजन घालणारे सत्य.
हे पुस्तक आता घेतल पाहिजे. खरच मनापासून धन्यवाद.