हिंदी आणि खडी बोली यांत काय फरक आहे?  मला तरी माहीत नाही. हिंदुस्थानीमध्ये इतर कोणत्या भारतीय भाषांची सरमिसळ झाली आहे त्यांची यादी शब्दांच्या उदाहरणासकट मिळाली तर बरे वाटेल.  नवीननवीन शब्दनिर्मितीसाठी हिंदुस्थानी सक्षम आहे?
अधिकृत हिंदी ही संस्कृताधारित असल्याने एका शब्दावर संस्कार करून अनेक तांत्रिक शब्द बनवता येतात.  हिंदुस्थानीची ती ताकद नाही. आणि उर्दू हीच मुळात अरबी, फारसी, दखनी  आणि हिंदीच्या मिश्रणातून झाली आहे, उर्दूपासून हिंदी नाही तर हिंदीतली वाक्यरचना, क्रियापदे आदी घेऊन उर्दू बनली आहे.  'मैं खाता हूं'  हे वाक्य हिंदी आहे की उर्दू?  हिंदुस्थानी सोपी आहे, म्हणूनच ती रोजच्या व्यवहारासाठी उपयुक्त आहे, आणि म्हणून लोकप्रिय झाली. आजकालच्या चित्रपटांमधून हिंदुस्थानी शब्द कमी होत आलले आहेत, आणि त्यांची जागा संस्कृत आणि इंग्रजी शब्द घेत आहेत. ..--अद्वैतुल्लाखान