चल, जाऊ आठवणींच्या गावा येथे हे वाचायला मिळाले:
माणसाला घाबरायला आणि इतरांना घाबरवायला फार आवडतं. अगदी लहान मुलांना देखील अंधाराची भीती वाटते त्याच वेळी त्या अंधारात खरोखरचं काय आहे हे बघण्याची जिज्ञासाही असते. अज्ञाताचे आकर्षण लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच असते. या तूनच गूढ, विस्मयकारी, अतर्क्य, अनपेक्षित भयकथा सांगितल्या ऐकल्या जातात.. कोंकणातल्या खेड्यापाड्यांमध्येतर या अशा भुताखेतांच्या गोष्टींचा सुळसुळाटच असतो.. उन्हाळ्याच्या सुट्टीत दिवसभर उनाडक्या करून थकल्यावर संध्याकाळच्या रिकाम्या वेळी पडकं घर, दुर्गम जागा, स्मशान, पिंपळाच झाड वगैरे वगैरे असलेल्या या गोष्टींना उत येत असे.. ...