चल, जाऊ आठवणींच्या गावा येथे हे वाचायला मिळाले:

============================

एकदा एका उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी प्रमाणेच आम्ही मुलं करवंद तोडायला म्हणून रानात गेलो होतो. सगळ्यांनी सागवानाच्या दोन-तीन पानांना काटक्या टोचून मोठे-मोठे द्रोण बनवून घेतले होते. त्या दिवशी आम्ही खूप करवंद जमा करायची असं ठरवलं होतं. कोणत्या जाळीत कशी आणि किती करवंद असतात हे माहीत असलेले आम्ही मोठ्या मोठ्या करवंदांनी लगडलेल्या मोक्याच्या जाळ्या गाठत चाललेलो.. झऱ्या जवळून जाणाऱ्या वाटेने चार सव्वाचार च्या सुमारास डोंगरावर निघालेले आम्ही फीर फीर फिरलो. एका उंबराच्या झाडाखाली एक मस्त करवंदाची जाळी दिसली ...
पुढे वाचा. : भुतं आणि भीती.. ()