दिसामाजी काहीतरी... » “ती” येथे हे वाचायला मिळाले:

होय ती ! उणीपुरी दोन वर्षेच लोटली आमच्या भेटीला ! पण आज मात्र माझे उभे आयुष्य व्यापूनही दशांगुळे उरलीय. मला तर जणू पहिल्याच भेटीत वेड लावले तिने! सुरुवातीला हा ही एक आकर्षणाचा प्रकार असेल असे म्हणून मी ही दुर्लक्ष्य करीत होतो पण हळूहळू हे त्याहूनही काही वेगळे आहे हे कळायला लागले.

तसे पाहायला गेले तर ती आणि मी बऱ्यापैकी सारखे आणि बऱ्यापैकी वेगळे सुद्धा! मी खूप जास्त विचार करणारा तशीच ती पण. पण ज्या वेळी मी नरम पडतो अगर भावनाविवश होतो त्या वेळी ती खंबीर असते, मला आधार देण्यासाठीच जणू! ती लिहिते सुंदर. बोलतेही खूप छान! अभ्यासात तर ...
पुढे वाचा. : “ती”