तुम्ही या लेखामध्ये पुस्तकाची आणि लेखकाची ओळख थोड्या पण योग्य शब्दात करून दिली आहे. धन्यवाद.
हे पुस्तक म्हणजे रूढार्थाने प्रवासवर्णन नाही तर  हा प्रवास आहे त्या भागातील नक्षलवादाचा, माओवादाचा, संघर्षाचा, जनतेचा आणि समाजव्यवस्थेचा. हा प्रवास आहे अनुभवविश्वातला.  हा प्रवास हा कधी न संपणारा आणि प्रश्नांचे गाठोडे वाढवत जाणारा.

हे पुस्तक विरंगुळा आणि केवळ मनोरंजनाचे पुस्तक नाही.  स्वतःला पुढारलेले समजणाऱ्या आणि मध्यमवर्गीय मानसिकता असणाऱ्यांनी तर या पुस्तकाच्या वाटेला मुळीच जाऊ नये. उगीच डोक्याला ताप आणि पैसे गेले याची हळहळ.

चक्रवर्ती यांचे लेखन प्रवचन फॉर्म मधले नसले तरी अनेक ठिकाणी भाषा इतकी आग्रही आहे की  त्यांची मते ते वाचकाला मान्य करायला भाग पाडत आहेत असे जाणवले.   ( हे मत त्यांच्या एकंदर लेखनाला लागू व्हावे. यात दुमत असू शकेल)
अर्थात या ठिकाणी तटस्थ राहणारी व्यक्ती विरळाच. ते शक्य नाहीच.
पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.