टेलीपथीवर माझा विश्वास नाही, पण अशी लेखमाला सुरू करावी असे मला अलीकडेच वाटले होते. आता ही सुरू झाली आहे तर तिचे मनापासून स्वागत. लेखकाने ही लेखमाला मुक्त ठेवावी ही विनंती. ज्यांना त्यात आपापल्या परीने भर घालावीशी वाटेल त्यांना ती घालता येईल अशी. भाग अर्थात अकरापेक्षा अधिक होतील पण अधिकस्य अधिकं फलं ( चूभूदेघे) या न्यायाने ते या लेखमालेच्या मूळ हेतूला पूरकच ठरेल. शे(अ)रोशायरी हे शीर्षकही छान. त्यातले १/११ काढून टाकायला लेखकाची परवानगी आहे का? (उगीचच ते ९/११, २६/११ सारखे अतिरेकी वाटते हे आणखी एक कारण! )
निवडक शेर घेण्याविषयी थोडेसे दुमत आहे. प्रसिद्ध गजलांमधीलही काही शेर अप्रसिद्ध, अनवट असे असतात. संपूर्ण गजल घेऊन तिचा अर्थ, रसास्वाद जे काय म्हणाल ते- केला तर अधिक बरे असे माझे मत. 
अशा उपक्रमातूनच समग्र सार्थ गालिब, समग्र सार्थ मीर आंतरजालावर आले तर काय बहार होईल!
प्रस्तुत गजल व तिचा रसास्वाद सुरेख आहे. या गजलेतील उर्वरीत शेरांचा अर्थ लावण्याचा माझा हा प्रयत्नः
हम कहां किस्मत आजमाने जायें
तू ही जब खंजर-आजमा न हुआ
खंजर-आजमां म्हणजे चाकू चालवणारा (री) . वार जर तुझ्याकडून होणार नसतील तर ते वार झेलण्यात तरी काय अर्थ आहे?
जख्म  गर दब गया, लहू न थमा
काम गर रुक गया, रवा न हुआ
रवा होणे म्हणजे प्रवाही होणे (अर्थ साभार चित्त). जखम दाबून धरली तरी रक्त वाहायचं थांबलं नाही. दुसऱ्या ओळीचा बाकी अर्थ इतका सामान्य असेल असे वाटत नाही. तज्ज्ञांनी कृपया खुलासा करावा. 
रहजनी है, कि दिलसितानी है
ले के दिल, दिलसितां रवाना हुआ
रहजनी म्हणजे लूटमार, दिलसितानी म्हणजे प्रेम, दिलसितां म्हणजे प्रेमी. आमचे हृदय घेऊन  प्रेमी फरार झाला.हे प्रेम आहे की लूट?
कुछ तो पढिए, कि लोग कहते हैं
आज 'गालिब' गजलसरा न हुआ
गजलसरा म्हणजे गजल म्हणणारा - अर्थ उघड आहे
(माझ्या मते या गजलेतले शेवटचे दोन शेर ही या गजलेची कमजोरी आहे.)
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
संजोप राव