मानस,
एक चांगला व उपयुक्त उपक्रम हाती घेतल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. लेख आवडला. इच्छुक वाचकांना ही संपूर्ण गजल देवनागरीत इथे व रोमन लिपीत इथे वाचता येईल.
जम्मा करते हो क्यूं रकीबो को
इक तमाशा हुआ, गिला न हुआ
(रकीब=शत्रू, प्रतिस्पर्धी. गिला=तक्रार)
गालिब म्हणतोय की, ’जम्मा
करते हो क्यूं रकीबो को’ म्हणजे माझ्या शत्रूंना तुम्ही का गोळा करताहात?
हा तर ’इक तमाशा हुआ’, म्हणजे एक तमाशा होईल’, ’गिला न हुआ’ म्हणजे माझ्या
विरुद्ध तक्रार करणे होणार नाही. शायर आपल्याला प्रतिस्पर्ध्याला उद्देशून
असे म्हणतोय, वाद तुझ्या-माझ्यात आहे, तुला माझ्या विरोधात जर काही
बोलायचे आहे, काही तक्रार करायची आहे, तर ती माझ्या समोरासमोर येऊन कर,
माझ्या शत्रूंना असे गोळा करुन तू जे करतो आहेस तो एक तमाशाच आहे, माझ्या
विरुद्ध तक्रार करण्याची की कुठली पद्धत आहे?
- मला वाटतं ग़ालिब इथे आपल्या प्रतिस्पर्ध्यास उद्देशून बोलत नसून आपल्या प्रेयसीशी बोलत आहे. उगीच माझ्या प्रेमातील प्रतिस्पर्ध्यांना/शत्रूंना कशाला गोळा करत आहेस? त्यांची फुकट करमणूक होईल, एक तमाशा होईल. तुझे जे काही गिले-शिकवे, ज्या काही तक्रारी असतील त्या एकांतात मांड, उगाच जगास तमाशा नको. अवांतर, "जम्मा" ऐवजी "जम'अ" अधिक उच्चारानुसारी होईल.
कितने शीरी है तेरे लब के, रकीब,
गालिया खाके भी बे-मझा न हुआ
दुसरी ओळ "गालियांँ खाके बे-मझा न हुआ" अशी हवी. 'भी' नको.
ही गजल बेगम अख्तर ह्यांच्या स्वरात इथे व लता मंगेशकरांच्या स्वरात इथे ऐका.