दिलसे,
विषयांतर अजिबात झालेले नाही.
गाडगीळांनी प्रशांत दामले यांचीही मुलाखत किमान तीन वेळा घेतलेली आहे. गाडगीळांच्या शैलीबाबत आक्षेप नाही. त्यांनी किंवा इतर कोणत्याही सूत्रसंचालकाने प्रश्न प्रयत्नपूर्वक नवे शोधले पाहिजेत.
देशस्थ-कोकणस्थ विनोदाचा उल्लेख आपण केलात. यादीत आणखी एक भर म्हणजे- पुण्यावरचे विनोद. महाराष्ट्रातील असंख्य लेखक, सूत्रसंचालक, रिकामटेकडे व पुरेसा अभ्यास नसताना बोलणारे या चार गटातील व्यक्तींना या विषयाने जिवंत ठेवलेले आहे.
जावेद अख्तर यांचा संदर्भ मूल्यवान वाटला.